काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला होता की, या सर्व प्रकरणामुळे माझ्या मुलांचे खूप जास्त नुकसान होत आहे. मी केस मागे घ्यायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की, माझ्या मुलांना मला भेटू दिले पाहिजे.
कारण गेल्या काही दिवसांपासून माझे मुले शाळेत गेले नाहीत. यासर्व प्रकरणामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने एक व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप केले होते.