सिनेमासाठी केवळ एक रूपयाचं मानधन ते अमिताभ बच्चनपेक्षा जास्त फी, फिल्मफेयर पुरस्कार नाकारणारे अभिनेते प्राण यांची 102 वी जयंती

| Updated on: Feb 12, 2022 | 8:15 AM

बॉलिवूडमधील सर्वात खतरनाक खलनायकांपैकी एक असलेल्या अभिनेते प्राण यांची आज 102 वी जयंती आहे. या निमित्त त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊयात...

1 / 6
प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1920 रोजी जुन्या दिल्लीत झाला. त्यांचं पूर्ण नाव प्राण कृष्ण सिकंदर होतं. कालांतराने त्यांना प्राण याचा नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी वठवलेल्या खलनायकाच्या भूमिका आजही अंगावर काटा आणतात...

2 / 6
प्राण यांनी करिअरच्या सुरुवातीला 1940 ते 1947 या काळात नायक म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तर 1942 ते 1991 मध्ये त्यांनी खलनायकाच्या केलेल्या भूमिका आजही लोकांना आवडतात. त्यांचं अभिनयावर इतकं प्रेम होतं की त्यांनी 'बॉबी' हा चित्रपट अवघ्या एका रुपयात साइन केला होता.

3 / 6
प्राण हे त्याकाळी चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होते. एक काळ असा होता जेव्हा प्राण यांना चित्रपटातील मुख्य कलाकारांपेक्षा जास्त मानधन मिळत असे. हे मानधन शहंशाह अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त होतं. प्राण यांनीच अमिताभ बच्चन यांना प्रकाश मेहरा यांच्याकडे नेले आणि त्यांना 'जंजीर' हा चित्रपट मिळाला.

4 / 6
प्राण यांना तीन वेळा फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. 'आंसू बने मुस्कान', 'उपकार', 'बेईमान' या सिनेमातील त्यांच्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं. या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. 1973 मध्ये बेईमान चित्रपटातील राम सिंह या पोलिस कॉन्स्टेबलच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेयर अवॉर्ड जाहीर झाला पण तो स्विकारण्यास त्यांनी नकार दिला.

5 / 6
एकीकडे फिल्मफेयर पुरस्कार मिळावा म्हणून अनेकजण रांगेत होते. तर दुसरीकडे प्राण यांनी हा मानाचा पुरस्कार नाकारला होता. त्याचं कारणही तसंच होतं. त्यांचं म्हणणं होतं की पाकिजा चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक गुलाम मोहम्मद यांना पुरस्कार मिळायला हवा होता. पण ज्या चित्रपटात प्राण यांनी स्वत: काम केलं त्याच चित्रपटाचे संगितकार शंकर-जयकिशन यांना पुरस्कार जाहीर झाला. यावरच प्राण नाराज झाले आणि त्यांनी  फिल्मफेयर पुरस्कार स्विकारण्यास नकार दिला.

6 / 6
12 जुलै 2013 या दिवशी प्राण यांचं मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झालं. त्यादिवशी अख्खं बॉलिवूड शोकाकूल झालं होतं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.