अभिनेता रणवीर सिंह त्यांच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. त्याची स्टाईल नेहमी सोशल मीडियावर चर्चत असते. आताही त्याने असेच हटके फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
काळ्या रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचा टि-शर्ट, त्यावर जाणारं काळ्या रंगाचं हटके जॅकेट असा हा रणवीरचा नवा 'अवतार' अनेकांना आवडलाय. या सगळ्या लुकवर जाणारा काळ्या रंगाचा गॉगल त्याने घातलाय.
आता रणवीरने हा असे हटके फोटो शेअर केल्यावर त्यावर लाईक्सचा पाऊस तर पडणारच होता. त्याच्या या फोटोला 2 लाख 30 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.
यासोबतच रणवीरने कूल लूकमधले फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये तो पांढऱ्या रंगाच्या टि-शर्टमध्ये दिसतोय.
या फोटोला त्याने "Attitude of Gratitude" असं कॅप्शन दिलं आहे. रणवीरचं हे एक वेगळं फोटोशूटही त्यांच्या चाहत्यांना आवडलंय.
7 लाख 30 हजारांहून अधिक जणांनी त्याचे हे फोटो लाईक केलेत. त्याचा हा लूक तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.