शाहरुख खान याचा पठाण चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाने ओपनिंग डेलाच मोठा धमाका करत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान देखील अॅक्शन करताना दिसला. विशेष म्हणजे चित्रपटामध्ये ज्यावेळी पठाण अडचणीमध्ये होता, त्यावेळी सलमान खान पठाणसाठी धावून आल्याचे दाखवण्यात आले आहे. पठाण चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.
शाहरुख खान आणि सलमान खान याचा जलवा परत एकदा चाहत्यांना बघायला मिळणार आहे. सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित टायगर ३ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान याच्या या चित्रपटामध्ये शाहरुख खान याची झलकही पाहण्यास मिळेल.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सलमान खान याच्या टायगर ३ चे पोस्टर शेअर केले. यावेळी त्यांनी लिहिले की, पठाणमध्ये शाहरुख खान आणि सलमान खानची जादू दिसली. टायगर ३ या चित्रपटातून ही जोडी 2023 च्या दिवाळीला एकत्र दिसणार आहे.
म्हणजेच दिवाळीमध्ये सलमान खान याचा टायगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याच वर्षी सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शहनाज गिल ही किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे.