बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि करिश्मा कपूर या दोघींनी समुद्र किनारी मुलांसोबत निवांत बसलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. करिनाने याला 'Spring Break 2022', असं कॅप्शन दिलं आहे. तर करिश्माने हार्ट शेअर करत फॅमिली लव्ह म्हटलंय.
करिश्माने करिना सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. याचा तिने आम्ही एकमेकांसोबत असतो तेव्हा आमच्यातली नातं अधिक घट्ट होतं जातं असं लिहिलंय.
करिनाने तिचा लहान मुलगा जेहसोबतचा फोटो शेअर केलाय. याला साडे सात लाखांहून अधिकांनी लाऊक केलंय. तर आलिया भटने या फोटोवर हार्ट कमेंट केली आहे.
करिश्माने एक सेल्फी शेअर केलाय. याला तिने' Burnt',असं कॅप्शन दिलं आहे.
या आधीही या दोघी फॅमिलीसोबत इन्जॉय करताना दिसल्या आहेत.