अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी खास चर्चेत असते. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमी सोशल मीडिया सेन्सेशन असतात.
आता पुन्हा एकदा करिश्मा तन्नानं सुंदर फोटो शेअर करून लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये घरातच तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतंच सुरज पे मंगल भारी या चित्रपटात एका विशेष भूमिकेत दिसली होती. याशिवाय करिश्माने रणबीर कपूरसोबत संजू या चित्रपटात काम केले आहे.
छोट्या पडद्यावर करिश्मा, नागिन 3, क्यूंकी सास भी कभी बहू थी, नागार्जुन या मालिकांमध्ये दिसली होती.