माधुरी दीक्षित हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा; पतीसोबत फोटो पोस्ट करत म्हणाली…
अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी दीक्षित हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
2 / 5
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर फिदा झाले आहेत.
3 / 5
माधुरी हिने फक्त स्वतःचे नाही तर पती श्रीराम नेने यांच्यासोबत देखील फोटो पोस्ट केले आहेत. पतीसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
4 / 5
सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त माधुरी दीक्षित हिच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
5 / 5
माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.