अभिनेत्री मंदाना करीमीने बॉलिवूडमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. मात्र, मंदानाने आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केलाय.
मंदानाने नुकताच अत्यंत मोठा खुलासा केला असून मंदाना म्हणाली की, माझे दोन भाऊ आणि आई सध्या इराणमध्येच आहेत. मात्र तिथे इतके जास्त निर्बंध आहेत की, मी तिथे राहू शकत नाही.
मंदाना पुढे म्हणाली की, इराणमध्ये मलाही काही गोष्टी करण्यापासून कितीतरी वेळा रोखण्यात आले. इतकेच नाही तर मला दोन दिवस पोलिस स्टेशनमध्ये राहण्याची वेळ आली होती.
मंदाना पुढे म्हणाली की, संपूर्ण जगाने इराणी महिलांना साथ द्यावी...कारण मानवी हक्क आणि महिला समानतेसाठी हा लढा सुरू आहे.