प्रियांका चोप्रा ही तिच्या आगामी बेव सीरिजचे प्रमोशन करताना दिसत आहे. प्रियंका चोप्राची ही वेब सीरिज Amazon Prime वर रिलीज होणार आहे. चाहते गेल्या काही दिवसांपासून या वेब सीरिजची वाट पाहात आहेत.
काही दिवसांपूर्वी शाहरुख खान याने मोठे विधान केले होते आणि त्यामुळे प्रियंका चोप्रा ही चर्चेत आली होती. आता यावर बोलताना प्रियंका चोप्रा म्हणाली की, कंफर्टेबल मला खूप जास्त बोरिंग होते.
पुढे प्रियांका चोप्रा म्हणाली, मुळात म्हणजे मी घमंडी नक्कीच नाहीये तर मला आत्मविश्वास आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान म्हणाला होता की, मी बाॅलिवूडमध्ये कंफर्टेबल असताना मी हाॅलिवूडमध्ये का जाऊ...
आता यावरच प्रियांका चोप्रा हिने खतरनाक उत्तर देत म्हटले की, माझ्यासाठी कंफर्टेबल खूप बोरिंग आहे. प्रियांका चोप्रा म्हणाली, मी जेंव्हा सेटवर जाते, त्यावेळी मी काय करते यावर माझे पूर्ण लक्ष असते.