चुगल्या करणाऱ्या काकुबाईंच्या गँगसोबत तुम्ही…? श्रद्ध कपूरने चाहत्यांना विचारला हटके प्रश्न
सध्या दिवाळी सण प्रत्येक जण मोठ्या थाटात साजरा करत आहे. सोशल मीडियावर देखील दिवाळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशात अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला आहे.
1 / 5
अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका प्रश्नामुळे चर्चेत आली. आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने एक प्रश्न विचारला आहे.
2 / 5
स्वतःचे काही साडीतील फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने विचारलं, 'दिवाळीच्या दिवसांत तुम्ही चुगल्या करणाऱ्या काकुबाईंपासून स्वतःचा बचाव करता की त्यांची गँगमध्ये सामील होता??' असा प्रश्न अभिनेत्रीने विचारला.
3 / 5
कमेंटमध्ये नेटकरी श्रद्धा कपूर हिच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. दरम्यान श्रद्धाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4 / 5
'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
5 / 5
श्रद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतः फोटो पोस्ट करत असते.