बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची आई सुनीता कपूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त सोनमने तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनमने आईसोबतचे काही सुंदर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. यात तिने बालपणीच्या फोटोंचा खजिनाही शेअर केलाय.
सोनमने या फोटोंना तितकंच भावनिक कॅप्शन दिलं आहे. "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई... तू जगातील सर्वोत्तम आई आहेस. माझ्यासमोर उभं केलेलं सर्वोत्तम उदाहरण! जगात मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते आई... लव्ह यू... तुझी लाडकी लेक", असं कॅप्शन सोनमने दिलंय.
सोनमने तिच्या फॅमिलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात तिची आई सुनीता कपूर, वडील अनिल कपूर बहिण रिया कपूर दिसत आहेत.
सोनमने नुकतंच तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. लवकरच तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी दिली.