अभिनेत्री तारा सुतारियाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाल दाखवू शकले नाहीत, मात्र ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
सध्या ताराकडे तीन मोठे चित्रपट आहेत ज्यासाठी सध्या ती तयारी करतेय. मात्र सध्या बॉलिवूडच्या सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक असलेली तारा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
तर सध्या ताराचं हे फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बॅक अँड व्हाईट अंदाजात शेअर केलेले हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तारा आता नव्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे, तारा सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू चित्रपट ‘तडप’मध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
तर सप्टेंबरपर्यंत हा चित्रपट रिलीज होईल अशी चर्चा आहे. त्याचबरोबर ती टायगर श्रॉफच्या 'हिरोपंती 2' मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकीही आहे. तारा एक व्हिलन रिटर्न्सचं शूटिंग देखील करत आहे. तिचे हे फोटो सध्या चाहत्यांना घायाळ करत आहेत.