अभिनेत्री मनिषा कोईराला आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
वयाच्या 53 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे.. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत आहेत.
आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, ओटीटी प्लॅटफॉर्मवर चर्चेत आहे. मनिषा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
मनिषा सध्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ सीरिजच्या दुसऱ्या भागासाठी काम करत आहे. सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
सोशल मीडियावर मनिषा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर 2.5 मिलियन नेटकरी फॉलो करतात तर, अभिनेत्री फक्त 1,166 नेटकऱ्यांना फॉलो करते.