दिग्दर्शक रमेश तुरानी यांच्या दिवाळी पार्टीत अनेक बाॅलिवूड स्टार्सने हजेरी लावली होती. कतरिना कैफ आणि विकी काैशल देखील या पार्टीत पोहचले होते.
जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांनीही पार्टीला हजेरी लावली. सी-ब्लू कलरच्या आउटफिटमध्ये जेनेलियाचा लूक एकदम जबरदस्त दिसत होता.
रमेश तुरानी यांच्या दिवाळी पार्टीत हिमेश रेशमिया आणि सोनिया कपूर यांनीही हजेरी लावली होती. यावेळी सोनिया आणि हिमेशचा लूक सुंदर दिसत होता.
गेल्या काही दिवसांपासून शहनाज गिल चर्चेत आहे. बिग बाॅसमधून शहनाजला खरी ओळख मिळालीये. सलमान खानसोबत शहनाजचे रिलेशन अत्यंत चांगले आहे.
नील नितिन मुकेश- रुक्मिणी यांनीही या पार्टीला हजेरी लावली होती. नोरा फतेहीचा लूक देखील जबरदस्त असा होता.