अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
श्रद्धा हिने काळ्या रंगाच्या सूटमध्ये क्लासी फोटोशूट केलं आहे. फोटोमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, मला कुत्रे जास्त आवडतात पण आज मला काळ्या मांजरीसारखं वाटत आहे.. असं लिहिलं आहे.
श्रद्धा पोस्टवर चाहते देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.