अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चा, मलायकासोबत दिसणारा मिस्ट्री मॅन कोण? फोटो तुफान व्हायरल
सध्या अभिनेत्री मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूर यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. ब्रेकअपच्या चर्चा रंगत असताना मलायका हिला एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे मलायका हिच्यासोबत दिसणारा पुरुष कोण? अशी चर्चा रंगत आहे.
1 / 5
अभिनेता अर्जुन कपूर यांच्यासोबत ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताना मलायका अरोरा हिचा मिस्ट्री मॅनसोबत एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या फोटोची चर्चा रंगली आहे.
2 / 5
मलायका हिच्यासोबत दिसणार मिस्ट्री मॅन दुसरा तिसरा कोणी नाहीतर, अभिनेत्री दिशा पटानी हिचा बॉयफ्रेंड एलेक्झेंडर एलेक्स आहे. मलायका आणि एलेक्झेंडर सेल्फीमध्ये आनंदाने पोज देताना दिसत आहेत.
3 / 5
मलायका हिच्यासोबत एलेक्झेंडर याचा असलेला फोटो 5 वर्ष जुना आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये मलायका हिने 'चॅनी चाय 5 वर्ष...' असं लिहिलं आहे.
4 / 5
मलायाका कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र मलायका हिच्या चर्चा रंगल्या आहेत.
5 / 5
सांगायचं झालं तर, एलेक्झेंडर याला दिशा हिच्यासोबत अनेकदा स्पॉट देखील करण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा देखील रंगली आहे.