मुलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताच, चढला सुष्मिता सेन हिच्या वहिणीचा पारा, चारु असोपा म्हणाली
ब्लाॅगच्या माध्यमातून चारु असोपा ही आपल्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे, याची माहिती आपल्या चाहत्यांना कायमच देते. मात्र, मुलीबद्दल एका विषयावर कायमच चर्चा होत असल्याने आता चारु असोपा हिचा पारा चढल्याचे दिसत आहे.
1 / 5
सुष्मिता सेन हिची वहिणी आणि टीव्ही अभिनेत्री चारु असोपा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी चारु असोपा आणि सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता.
2 / 5
ब्लाॅगच्या माध्यमातून चारु असोपा ही आपल्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे, याची माहिती आपल्या चाहत्यांना कायमच देते. चारु असोपा आणि राजीव सेन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या.
3 / 5
आता चारु असोपा हिने तिच्या मुलीला ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. चारु असोपा हिच्या मुलीचे नाव जियाना आहे. राजीव सेन आणि चारु असोपा यांची मुलगी आता दीड वर्षांची झालीये.
4 / 5
ब्लाॅगमध्ये जियाना कधीच बोलताना दिसत नाही, यामुळे अनेक युजर्सने म्हटले आहे की, दीड वर्षांचे होऊनही जियाना हिला बोलताना कसे येत नाही. आता यावर चारु असोपा हिने भाष्य केले आहे. यावेळी चारु असोपा हिचा पारा चढल्याचे देखील दिसले.
5 / 5
चारु असोपा म्हणाली की, काही दिवसांपासून विचारले जात आहे जियाना अजून बोलत कशी नाहीये. बऱ्याच मुलांना थोडे उशीरा बोलता येते. पण असे नाही की, जियाना काहीच बोलत नाही. जियाना बऱ्याच वेळा मम्मी पप्पा असे म्हणते.