तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील कलाकारांवरही चाहते अफाट प्रेम करतात.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये सोनूचे पात्र साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बालकलाकार म्हणून निधीने तारक मेहतामध्ये काम केले.
2012 मध्ये निधीने तारक मेहता हा शो जाॅईन केला होता. आता निधी ही 24 वर्षांची झाली असून काही वर्षांपूर्वीच तिने मालिका सोडली आहे. बालकलाकार म्हणून करिअरची सुरूवात करणारी निधी आता अत्यंत बोल्ड दिसते.
काही दिवसांपूर्वीच आत्माराम तुकाराम भिडे यांची मुलगी सोनू आणि रिअल लाईफमधील निधी भानुशाली हिने सोशल मीडियावर बिकिनी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
निधी भानुशाली ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. तारक मेहता शो तिने सोडून आता बरेच वर्ष झाले आहेत. मात्र, अजूनही चाहते तिला सोनूच्याच नावाने ओळखतात. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे.