बोनी कपूरच्या लेकीने नुकताच मुंबईतील बांद्रा परिसरामध्ये नवे घर खरेदी केले आहे. हे घर तिने जवळपास 65 कोटींना विकत घेतले आहे.
विशेष म्हणजे या नव्या घरामध्ये जान्हवी शिफ्ट देखील झालीये. शुक्रवारी नवीन घराची पूजा करून जान्हवी तिथे राहण्यासाठी गेली आहे.
जान्हवी कपूरने तिच्या या नव्या घराची झलक आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये. जान्हवी कपूरचे हे नवीन घर डुप्लेक्स आहे आणि अत्यंत सुंदर देखील आहे.
जान्हवीच्या या घराची खास बाब म्हणजे घरामध्ये स्विमिंग पूल असून हे घर 8669 स्क्वेअर फूटमध्ये आहे. यामध्ये गार्डन देखील आहे.
खुशी कपूर आणि वडील बोनी कपूर यांच्यासोबत मिळून जान्हवीने हे घर खरेदी केले आहे. हे घर जान्हवीने खास डिझाईन करून घेतले आहे.
जान्हवी कपूर हिने आवडीच्या काही गोष्टी घरात बनवल्या आहेत. तिने तिचे बेडरूम खास डिझाईन करून घेतले आहे. ज्याचा फोटो तिने शेअर केलाय.