Sher Shivraj: चिन्मय मांडलेकरने शेअर केली ‘शेर शिवराज’ची पडद्यामागील दृश्ये
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शेर शिवराज' (Sher Shivraj) या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर याने इन्स्टाग्रामवर काही पडद्यामागचे फोटो पोस्ट केले आहेत.
Sher Shivraj
Image Credit source: Instagram
-
-
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर याने इन्स्टाग्रामवर काही पडद्यामागचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
-
‘जिजाऊ महाराजांना रागे भरतात त्या दृश्याच्या चित्रिकरणाच्या वेळी एक हसरा क्षण,’ असं कॅप्शन देत चिन्मयने हा फोटो पोस्ट केला आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या चित्रपटात जिजाऊंच्या भूमिकेत आहेत.
-
-
माझ्या आवडत्या फोटोंपैकी एक.. नाईक आणि महाराजांची मसलत.. असं कॅप्शन देत चिन्मयने हा फोटो पोस्ट केला. दिग्दर्शक दिग्पाल आणि चिन्मय यांच्यात खूप चांगली मैत्री आहे.
-
-
अफजल खानाच्या वधामाग असलेलं युद्धकौशल्य, रणनिती, आयुर्वेदाचा अभ्यास, शत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि त्याच्या सैन्याबद्दल केलेला अभ्यास यांसारख्या अनेक बारिकसारिक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
-
-
‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, आणि ‘पावनखिंड’नंतर ‘शिवराज अष्टका’तील हा चौथा चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर इतर चित्रपटांकडून आव्हान असतानाही ‘शेर शिवराज’ दमदार कामगिरी करत आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 4.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे.