Raja Rani Chi Ga Jodi | ‘राजा-राणी’चं ‘डे आऊटिंग’, सुपर कूलमध्ये दिसली ‘ढाले-पाटलां’ची जोडी!
कलर्स मराठीच्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) ‘संजीवनी ढाले-पाटील’ सकारत आहे. तर, अभिनेता मणिराज पवार (Maniraj Pawar) ‘रणजीत ढाले-पाटील’ साकारताना दिसत आहे.
1 / 6
छोट्या पडद्यावरची सुपरहिट मालिका ‘राजा राणीची गं जोडी’ (Raja Rani Chi Ga Jodi) सध्या खूपच चर्चेत आली आहे. या मालिकेतील लोकप्रिय जोडी रणजीत ढाले-पाटील आणि संजीवनी ढाले-पाटील प्रेक्षकांना चांगलेच भावले आहेत.
2 / 6
सध्या मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मात्र, या सगळ्यातूनही आपल्यातील नातं फुलवण्यासाठी लाडक्या ‘राजा-राणी’ने अर्थात संजू आणि रणजीत यांनी ‘डे आऊटिंग’ची योजना आखली आहे.
3 / 6
या ‘डे आऊटिंग’ खास दोघेही एका सुपर कूल लूकमध्ये तयार झाले होते. यावेळी संजीवनीने जीन्स आणि शर्ट परिधान केलं होतं. तर, रणजीत देखील डेनिम आऊट फिटमध्ये अतिशय देखणा दिसत होता.
4 / 6
या खास भागाचं शूटिंग अतिशय निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आलं आहे. यानिमित्ताने संजीवनी बुलेटवर आपल्या राजाला फिरवताना दिसली. नदीच्या काठी या जोडीने एकमेकांसोबत वेळ घालवला.
5 / 6
कलर्स मराठीच्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) ‘संजीवनी ढाले-पाटील’ सकारत आहे. तर, अभिनेता मणिराज पवार (Maniraj Pawar) ‘रणजीत ढाले-पाटील’ साकारताना दिसत आहे.
6 / 6
ऑनस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच शिवानी आणि मणिराज यांची ऑफस्कीन केमिस्ट्री देखील चाहत्यांना सोशल मीडियावर पाहायला मिळते. आपल्या आवडत्या ‘राजा-राणी’च्या जोडीला या सुपर कूल लूकमध्ये पाहून प्रेक्षक देखील खूप आनंदी झाले आहेत.