Rushikesh Wamburkar | कॉमेडीची बुलेट ट्रेननंतर, ‘A फक्त तूच’ चित्रपटात ऋषिकेश साकारणार ‘पक्या’ची भूमिका!

| Updated on: Dec 15, 2021 | 12:56 PM

शुभमंगल ऑनलाइन, अजूनही बरसात आहे अशा मालिकांमधून घराघराच पोहोचलेला अभिनेता ऋषिकेश वांबुरकर आता चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'A फक्त तूच' या आगामी चित्रपटात ऋषिकेश महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे.

1 / 5

2 / 5
मूळचा औरंगाबादचा असलेला ऋषिकेश प्रशिक्षित कलावंत आहे. त्यानं औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातून नाटक आणि अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे.

3 / 5
कॉमेडी बिमेडी, कॉमेडीची बुलेट ट्रेन अशा विनोदी कार्यक्रमांसह शुभमंगल ऑनलाइन, चांदणे शिंपित जाशी, अजूनही बरसात आहे अशा लोकप्रिय मालिकांतून त्यानं आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यानंतर आत जयदीप फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि रंगनाथ बबन पाचंगे दिग्दर्शन करत असलेल्या ‘A फक्त तूच' या चित्रपटात ऋषिकेशची महत्त्वाची भूमिका आहे.

4 / 5
अभिनेता चिन्मय उदगीरकर, सुरुची आडारकर यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटातील भूमिकेविषयी ऋषिकेश म्हणाला, की A फक्त तूच या चित्रपटातील पक्या ही भूमिका वाचताना आणि प्रत्यक्ष भूमिका साकारणं हा वेगळा अनुभव आहे.

5 / 5
दिग्दर्शक आणि कलाकारांमध्ये उत्तम ट्युनिंग जुळून आलं. या चित्रपटाचा भाग होता आलं याचा फार आनंद आहे. चित्रपटातील  माझ्या लुकवर विशेष काम केलेलं आहे. आतापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरेल.