झी मराठी वाहिनीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे जेमतेम चार वर्षांची एक चिमुरडी मायरा.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या या चिमुरडीचं नाव आहे मायरा वायकुळ. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या दोन बड्या कलाकारांच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाच्या चर्चेपेक्षाही क्युट मायरा भाव खाऊन जात आहे.
मायरानं आता सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मायरा वायकुळने टिकटॉक व्हिडीओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिकटॉक स्टार म्हणून तिची ओळख होती.
मायरा वायकुळ आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. तिची आई तिचे सोशल मीडिया अकाऊंट सांभाळते. फक्त मायराच नाही, तर तिची आई श्वेता वायकुळचेही इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.