झी मराठी वाहिनीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे जेमतेम चार वर्षांची एक चिमुरडी मायरा.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या या चिमुरडीचं नाव आहे मायरा वायकुळ. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या दोन बड्या कलाकारांच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाच्या चर्चेपेक्षाही क्युट मायरा भाव खाऊन जात आहे.
आता मायरानं तिच्या ऑनस्क्रिन आईसोबत मस्त फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये दोघीही ट्विनींग करताना दिसल्या आहेत.
प्रोमो आऊट झाल्यापासून मायराचा 'हमारे पास बोहोत पैसा हैं' हा डायलॉग गाजतोय. आता हेच डायलॉग लिहिलेले टी-शर्ट या दोघींनी परिधान केले आहेत.
दोघींचे हे फोटो सोशल मीडियावर आता प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. दोघींचा हा क्यूट अंदाज चाहत्यांचा चांगलाच पसंतीस उतरतो आहे.