ऐश्वर्या राय हिच्याबद्दल ‘या’ 5 गोष्टी फार कमी लोकांना आहेत माहिती

| Updated on: Apr 26, 2024 | 10:41 AM

बच्चन कुटुंबाची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची प्रसिद्धी आणि लोकप्रियता सातासमुद्रा पार आहे. जागतील सुंदर महिलांच्या यादीत अभिनेत्री अव्वल स्थानी आहे. त्यामुळे ऐश्वर्या बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आज ऐश्वर्या हिच्याबद्दल अशा 5 गोष्टी जाणून घेऊ ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत...

1 / 5
ऐश्वर्या राय हिच्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री 1994 मध्ये मिसवर्ल्ड झाली. त्यानंतर ऐश्वर्या हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

2 / 5
गेल्या दोन दशकांपासून ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ऐश्वर्या हिने 45 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

3 / 5
ऐश्वर्या हिने 1997 मध्ये 'इरुवर' सिनेमातून तामिळ सिनेविश्वात पदार्पण केलं. ऐश्वर्या हिच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाचं नाव 'और प्यार हो गया' असं आहे.

4 / 5
2003 मध्ये कान्स फिल्म फेस्टिवरमध्ये ज्यूरी सदस्य म्हणून मान मिळवणारी ऐश्वर्या पहिली भारतीय अभिनेत्री आहे. ऐश्वर्या तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते.

5 / 5
ओपरा विन्फ्रे शोमध्ये आमंत्रित होणारी आणि मॅडम तुसाद यांची प्रतिमा मिळवणारी ऐश्वर्या पहिली भारतीय अभिनेत्री आहे... अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.