बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आज (7 जुलै) या जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिलीप कुमार यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता मुंबईच्या सांताक्रूझ येथे त्यांचे अंत्यविधी पार पडणार आहेत.
दिलीप कुमार यांचे पार्थिव घरी नेताना त्यांच्या पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबतच होत्या. आता त्यांचे पार्थिव घरी पोहोचले आहे.
चित्रपट निर्माते मधुर भांडारकर हे देखील यावेळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपस्थित होते.
दिलीप कुमार या जगातून निघून गेल्याने संपूर्ण मनोरंजन विश्व शोकात आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.
दिलीप कुमार यांचे चाहतेही सोशल मीडियावर आपले दुःख आणि शोक व्यक्त करत आहेत.