Dishul Wedding : लग्नाच्या विधींना सुरुवात, पाहा राहुल आणि दिशा परमारच्या मेहंदीचे सुंदर फोटो
दिशूल अर्थात दिशा परमार आणि राहुल वैद्य यांच्या लग्नातील विधींना आता सुरुवात झाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. (Dishul Wedding: Beginning of wedding ceremony, see beautiful photos of Rahul and Disha Parmar's Mehndi)
1 / 6
दिशूल अर्थात दिशा परमार (Disha Parmar) आणि राहुल वैद्य (Rahul Vaidya) यांच्या लग्नाच्या विधी आता सुरू झाल्या आहेत. राहुल वैद्य आणि दिशा परमार शुक्रवारी (16 जुलै) विवाहबंधनात अडकणार आहेत.
2 / 6
लग्नातील महत्त्वाची विधी म्हणजे मेहंदी, 14 जुलैला दिशाला मेहंदी लागली आहे. यावेळी दिशा परमारनं गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस कॅरी केला होता. या गुलाबी सलवार सूटमध्ये ती सुंदर दिसत होती.
3 / 6
याआधी दिशाने ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत चाहत्यांना झलक दिली होती. दिशाला बिग बॉस 14 मध्ये राहुल वैद्यनं प्रपोज केलं होतं आणि शोमध्ये गेल्यानंतर दिशाने लग्न करण्याची तयारी दर्शविली. आता दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.
4 / 6
आता दुल्हेराजा राहुल आपल्या मेहंदी फंक्शनमध्ये आपल्या बायकोच्या प्रेमाची जादू अर्थात वधू दिशा परमारच्या हातावरची मेहंदी पाहण्यासाठी गेला होता. या दरम्यान या गोड जोडीने केवळ मीडियासाठी फोटो पोजच दिल्या नाहीत, तर राहुलने दिशासाठी एक रोमँटिक गाणेही गायले.
5 / 6
मेहंदीच्या विधीपूर्वी दिशानं आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर बॅचलर पार्टी सुद्धा केली होती. या पार्टीचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते.
6 / 6
राहुल आणि दिशाचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेनं वाट पाहात आहेत. आतापर्यंत त्यांच्या नावावर म्हणजेच दिशुलच्या 10 लाखाहून अधिक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आल्या आहेत.