Salman Khan | या कारणामुळे सुष्मिता सेन हिला करायचे नव्हते सलमान खान याच्यासोबत काम, चक्क अभिनेत्याने…
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान याला ईमेल करून जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केलीये.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. नुकताच सलमान खान याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील गाणे रिलीज झाले आहे. सलमान खान याने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत काम केले आहे.
2 / 5
सुष्मिता सेन आणि सलमान खान याच्या जोडीलाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले आहे. सुष्मिता सेन आणि सलमान खान यांची जोडी बीवी नंबर 1 या चित्रपटात हिट ठरली. मात्र, एककाळ असता होता की, सलमान खान याच्यासोबत काम करायला चक्क सुष्मिता सेन हिने नकार दिला होता.
3 / 5
बीवी नंबर 1 चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा सलमान खान आणि सुष्मिता सेन यांची भेट झाली. बीवी नंबर 1 चित्रपटाच्या सेटवर सलमान खान पोहचला आणि त्याने सुष्मिता सेन हिला हाय, हॅलो केले पण सलमान खान याला व्यवस्थित न बोलता सुष्मिता सेन ही निघून गेली.
4 / 5
याचे कारण सलमान खान याने चित्रपटाचे निर्माता डेविड धवन यांना विचारले. यावर डेविड धवन म्हणाले की, ती चित्रपटाच्या शूटिंगसाठी सकाळी 9 पासून मेकअप करून बसलीये आणि तू आता 11 ला आला आहेस. यावर सलमान खान हा डेविड धवन यांना म्हणाला की, ही समस्या माझी नाहीये, मी तुम्हाला अगोदरच सांगितले होते.
5 / 5
एककाळ असा होता, ज्यावेळी सुष्मिता सेन हिने थेट सलमान खान याच्यासोबत काम करण्यास नकार दिला. आता सलमान खान आणि सुष्मिता सेन हे चांगले मित्र आहेत. सलमान खान याने एका जुन्या मुलाखतीमध्ये बीवी नंबर 1 या चित्रपटाच्या सेटवरील हा किस्सा सांगितला होता.