Dussehra 2021 : उत्साह दसऱ्याचा; स्टार प्रवाहच्या कलाकारांनी सण-उत्सवानिमित्त व्यक्त केल्या भावना

| Updated on: Oct 15, 2021 | 12:36 PM

सण उत्सवाला एक वेगळं महत्त्व आह, आपण आपल्या व्यस्त जिवनातून वेळ काढत हे सण साजरे करत असतो. आपल्या लाडक्या कलाकारांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Dussehra 2021: Excitement of Dussehra; Emotions expressed by the artists of Star Pravah for the festival)

1 / 6
माधवी निमकर : 'दसऱ्याच्या दिवशी आम्ही लहानपणी नवे कपडे घालून आम्ही सोनं लुटायचो.  यादिवशी जवळचे नातलग आणि शेजाऱ्यांना आवर्जून जाऊन भेटायचो.  अलिकडच्या काळात हे कमी झालंय. हल्ली प्रत्यक्ष भेटच होत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. यंदा मात्र ठरवून मी माझ्या जवळच्या नातलगांना भेटून सोनं लुटणार आहे आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देणार आहे. माझ्या मुलासाठी देखील हा नवा अनुभव असेल.  ही परंपरा जपली नाही तर मुलांना नाती समजणार कशी.  त्यामुळे दसऱ्याला यंदा वेळ काढून प्रत्यक्ष शुभेच्छा देणार आहे.'

2 / 6
ज्ञानदा रामतीर्थकार : 'यंदाचा दसरा माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण नवरात्री मध्येच आमची नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी सुरू झालीय.  मालिकेचया नावातच सेलिब्रेशन आहे. दसऱ्याची सुट्टी आहे. त्यामुळे पुण्याला कुटुंबासोबत दसरा साजरा करणार आहे. शूटिंग मुळे घरच्यांपासून दूर राहतेय. त्यामुळे दसऱ्याला घरी जाण्याचा उत्साह आहे.'

3 / 6
मिलिंद गवळी : 'माझ्या घरी दरवर्षी घटस्थापना होते. माझी पत्नी माझ्याकडून आवर्जून पुजा अर्चा करुन घेते. दसऱ्याला घट हलवून त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करणं हे दरवर्षी ठरलेलं असतं. यंदा आम्ही आई कुठे काय करतेच्या सेटवरही घटस्थापना केली होती. नवरात्रीत खेळला जाणारा भोंडला हा प्रकारही चित्रीत करण्यात आला. विशेष बाब म्हणजे नवरात्रीत घटस्थापना करताना जी नऊ धान्य पेरली जातात. त्यातलं उरलेलं धान्य आमचा सेटिंग दादा राज पक्ष्यांना खाऊ घालतो. हे फक्त नवरात्री पुरतं नाही तर सेटवर शूटिंगसाठी आणलेल्या भाज्या, फळ धान्य फेकून न देता ते पक्ष्यांना आणि प्राण्यांना दिलं जातं. आम्ही कलाकार मंडळीही यात सहभाग घेतो. मला वाटतं निसर्ग जपण्यासाठी टाकलेलं हे एक छोटं पाऊल आहे. त्यामुळे नावाप्रमाणेच आमचा सेट समृद्ध झाला आहे.'

4 / 6
मंदार जाधव : 'दसरा हा सण माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. कारण पाच वर्षांपूर्वी मी माझ्या कमाईतून घर खरेदी केलं जे माझ्यासाठी खूपच लकी ठरलं आहे. मी दसऱ्याला आवर्जून सोनं खरेदी करतो. माझ्या घरी शस्त्र पूजा आणि सरस्वती पूजन केलं जातं. माझ्या दोन्ही मुलांसोबत मी यंदाही पूजा करेन. कुटुंबासोबत एकत्र घालवलेला वेळ हा सणासारखाच असतो. तोच सोनेरी क्षण यंदा जगणार आहे.'

5 / 6
रेश्मा शिंदे : 'माझ्या घरी दसऱ्याला आम्ही घरीच तोरण बनवतो. ते बनवण्यात एक वेगळाच आनंद आहे. दारासमोर रांगोळी रेखाटली जाते. सगळं कुटुंब मिळून आम्ही पूजा करतो. सोनं लुटतो. आम्ही दरवर्षी थोडं का होईना सोन्याची खरेदी करतो. माझ्या जवळच्या माणसांनी मला आयुष्यभर सोबत करावी हीच माझी इच्छा असते. त्यामुळे सणाचे हे दिवस माझ्यासाठी नेहमीच खास असतात. विशेष म्हणजे या आठवड्यात आमची रंग माझा वेगळा  मालिका नंबर वन आहे. त्यामुळे दसऱ्याचं सेलिब्रेशन डबल असणार आहे.'

6 / 6
अश्विनी महांगडे : 'माझे वडील म्हणजे नानांचं असं म्हणणं होतं की तू वर्षभर कितीही बिझी राहा मात्र वर्षातले तीन दिवस मात्र राखून ठेव. ते तीन दिवस म्हणजे आमची पसरणी गावची 2 दिवसाची जत्रा आणि दसरा. या तीन दिवसांना विशेष महत्व आहे. नाना आमच्यात नाहीत त्यामुळे यंदा त्यांचा वसा मी पुढे न्यायचं ठरवलं आहे. दसऱ्याला आमच्या गावी भैरवनाथाची पालखी निघते. त्या पालखी सोबत मी जाणार आहे. डोंगरदऱ्यातून वाट काढत ही पालखी निघते. हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो. '