माहेरच्या गोष्टी सासूबाईंना आवडल्या नव्हत्या, नवरा करायचा सतत मारहाण, जाचाला कंटाळलेल्या अभिनेत्रीचा मोठा निर्णय
Married Life : सूनेच्या माहेरुन आलेल्या भेटवस्तू पाहून सासूबाईंची नाराजी, गरोदर असताना देखील नवरा करायचा सतत मारहाण, अखेर जाचाला कंटाळलेल्या अभिनेत्रीचा उचललं टोकाचं पाऊल... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा.... सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, तिचा पहिला पती देखील प्रसिद्ध अभिनेता आहे.
1 / 5
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री दलजीत कौर आहे. दलजीत हिने 2009 मध्ये अभिनेता शालील भनोट याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं वैवाहिक आयुष्य फार चांगलं नव्हतं. लग्नानंतर दलजीत हिने एका मुलाला जन्म देखील दिला. पण मुलाच्या जन्मानंतर देखील दोघांमध्ये वाद सुरुच होते.
2 / 5
लग्नाच्या तीन वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. माहेरुन आलेल्या भेटवस्तू सासूबाईंना आवडल्या नसल्यामुळे दलजीत हिच्या सासूने बोलणं बंद केलं होतं. तर दुसरीकडे, शालीन देखील पत्नीपासून दूर राहू लागला होता. दलजीत हिला प्रेग्नेंसी दरम्यान, अस्थमाचा त्रास होऊ लागला. तरी देखील शालीन याने पत्नीकडे लक्ष दिलं नाही.
3 / 5
शालीन मुलासमोर मला मारहाण करत असल्याचा आरोप देखील दलजीत हिने लगावला होता. सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून अभिनेत्रीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये दलजीत आणि शालीन यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर 2022 मध्ये अभिनेत्रीने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
4 / 5
दलजीत हिने उद्योगपती निखिल पटेल याच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर अभिनेत्री मुलाला घेऊन परदेशात सुखी संसार करत आहे. निखिल कामाच्या निमित्ताने अनेकदा दुसऱ्या देशांमध्ये जात असल्यांमुळे दलजीत हिला एकटेपणा वाटतो.
5 / 5
अभिनेत्री कायम सोशल मीडियावर दुसऱ्या कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. दलजीत प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. अभिनेत्री अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.