Star Kids : ‘या’ स्टार किड्सच्या पदार्पणाची रसिकांना उत्सुकता, मात्र ते घेताहेत परदेशात शिक्षण
चाहते स्टारकिड्सच्या बॉलिवूड पदार्पणाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. पदार्पणापूर्वी, सुहाना खान, खुशी कपूर, यशवर्धन आहुजा सारखे अनेक स्टार किड्स शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात आहेत. आ (Fans are curious about the debut of these Star Kids, but they are studying in abroad)
1 / 7
सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरस्टार्सपेक्षा जास्त, त्यांची मुलं म्हणजेच स्टारकिड्स सोशल मीडियावर चर्चेत असतात. नेहमीच स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशी काही स्टार किड्स देखील सोशल मीडियावर सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलेलं नाही. मात्र लोक त्यांच्या पदार्पणाच्या बातमीची आतुरतेनं वाट पाहत आहेत. पदार्पणापूर्वी, सुहाना खान, खुशी कपूर, यशवर्धन आहुजा सारखे अनेक स्टार किड्स शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा स्टार किड्स बद्दल सांगणार आहोत, जे सध्या परदेशात शिकत आहेत मात्र ते भारतीय सोशल मीडियावरील सेलिब्रिटींपेक्षा कमी नाहीत.
2 / 7
यशवर्धन अहुजा : यशवर्धन अहुजा देखील वडील गोविंदाप्रमाणे अभिनेता होण्याचं स्वप्न पाहत आहे. करिअर सुरू करण्यापूर्वी तो लंडनच्या मेट फिल्म स्कूलमधून अभिनयाचं शिक्षण घेत आहे.
3 / 7
सुहाना खान : शाहरुखची मुलगी सुहाना खान, जी पदार्पणापूर्वीच स्टार बनली होती, तिलाही अभिनयात करिअर करायचं आहे. तिनं परदेशी लघुपटातही काम केलं आहे तसंच तिनं रंगभूमीवर स्वतःचा अभिनय जोपासला आहे. ती सध्या न्यूयॉर्क विद्यापीठातून अभिनय शिकत आहे.
4 / 7
न्यासा देवगण : अजय देवगण आणि काजोलची लाडकी मुलगी न्यासा देवगण नेहमीच चर्चेत असते. सध्या तिच्या पदार्पणाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. न्यासा सध्या युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथ ईस्ट एशिया, सिंगापूरमधून शिक्षण पूर्ण करत आहे.
5 / 7
खुशी कपूर : श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मध्यंतरी तिचे काही बोल्ड फोटोशूट व्हायरल झाले होते. आता लोक तिच्या पदार्पणाच्या घोषणेची वाट पाहत आहेत. ती न्यूयॉर्क फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे शिक्षण घेत आहे.
6 / 7
आर्यन खान : किंग खान अर्थात शाहरुखचा आर्यन खानच्या पदार्पणाची प्रतीक्षा अनेकांना आहे. मात्र वडील शाहरुखच्या म्हणण्यानुसार मुलगा आर्यनला अभिनयात रस नाही. त्याला दिग्दर्शनाच्या जगात नाव कमवायचं आहे. म्हणूनच तो दक्षिणी कॅलिफोर्निया विद्यापीठात सिनेमॅटिक आर्ट्सचा अभ्यास करतोय.
7 / 7
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री