मलायका अरोरा तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी हाॅट फोटो कायमच शेअर करते.
नुकताच मलायका अरोराच्या मूविंग इन विद मलाइका या शोमध्ये फराह खान हिने मोठा खुलासा केला आहे. फराह खान म्हणाली की, छैय्या छैय्या या गाण्यासाठी आमच्या रडारावर कधी मलायका नव्हतीच.
छैय्या छैय्या या गाण्यासाठी आम्ही काही अभिनेत्रींसोबत संपर्क केला होता. परंतू रेल्वेवर चढून कोणतीच अभिनेत्री डान्स करण्यासाठी तयार नव्हती.
छैय्या छैय्या गाण्यासाठी सर्वात अगोदर आम्ही शिल्पा शेट्टीला संपर्क केला होता. परंतू दुसऱ्या काही अभिनेत्रींप्रमाणे शिल्पा शेट्टी हिने गाण्यास नकार दिला.
अचानकपणे काही कळण्याच्या आत मलायका अरोरा हिने छैय्या छैय्या गाण्याला होकार दिला. विशेष म्हणजे हे गाणे इतके हिट होईल, असा कधी विचारही केला नव्हता.