Pathaan | पठाण चित्रपट बघता येणार फक्त एवढ्या रुपयांमध्ये, शाहरुख खान म्हणाला पॉपकॉर्नही फुकट…
विशेष म्हणजे आता पुढील काही दिवस बाॅक्स आॅफिसवरील कलेक्शनमध्ये मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण आता पठाण चित्रपटाचे तिकिट अत्यंत स्वस्त दरामध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे.
1 / 5
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय. आता पठाण चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल 22 दिवस उलटले आहेत. आता चित्रपटाने जगभरातून तब्बल 900 कोटींचा आकडा कमाईमध्ये पार केलाय.
2 / 5
विशेष म्हणजे आता पुढील काही दिवस बाॅक्स आॅफिसवरील कलेक्शनमध्ये मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण आता पठाण चित्रपटाचे तिकिट अत्यंत स्वस्त दरामध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे.
3 / 5
110 रूपयांमध्ये तुम्ही पठाण हा चित्रपट पाहू शकता. उद्या म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी पठाण चित्रपटाच्या तिकिटाचा दर 110 रूपये ठेवण्यात आलाय. यामुळे ज्यांनी पठाण अजूनही पाहिला नाहीये, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार.
4 / 5
यशराज फिल्म्सचे रोहन मल्होत्रा यांनीही ट्विट करून ही माहिती दिली. या पोस्टवर शाहरुख खान याने लिहिले की, अरे आता तर पाहावा लागेल चित्रपट...खरोखरच छान गोष्ट आहे...धन्यवाद YRF, तुम्ही मोफत पॉपकॉर्नची व्यवस्था करू शकता का! नाही?
5 / 5
पठाण चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. आता उद्या चित्रपट नेमके कोणते रेकाॅर्ड तोडतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण चित्रपटाच्या तिकिटाचे दर कमी झाल्यामुळे उद्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.