अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकर आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. शिबानीचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी पुण्यात झाला. शिबानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि पार्टनर फरहान अख्तरसोबत फोटो शेअर करत असते. आज शिबानीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला या गोंडस जोडप्याची लव्हस्टोरी सांगणार आहोत.
फरहान अख्तर आणि शिबानी यांची पहिली भेट ‘आय कॅन डू दॅट’ या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. फरहान शो होस्ट करत होता आणि शिबानी, गुरमीत चौधरी आणि व्हीजे बानीसह अनेक सेलेब्स या शोचा भाग होते.
या शोनंतर शिबानी आणि फरहानच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या. शिबानीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला ज्यात तिनं कोणाचा तरी हात पकडलेला होता आणि तिची पाठ दिसत होती. फोटो पाहिल्यानंतर लगेचच चाहत्यांना समजलं की तो फरहान अख्तर आहे.
नंतर, फरहान अख्तरनं सोशल मीडियावर तोच फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती दिली होती.
तेव्हापासून फरहान आणि शिबानी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दोघं अनेकदा एकत्र दिसतात.
फरहान आणि शिबानी दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनमध्ये पहिल्यांदाच लोकांसमोर आले. दोघांनी एकमेकांचा हात पकडला होता.