Sara Ali Khan : फिटनेस फ्रिक सारा, दुखापतग्रस्त असूनही पोहोचली जिमला
अभिनेत्री सारा अली खाननं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या नाकाला दुखापत झाल्याचे दिसलं होतं आता साराला मुंबईत स्पॉट करण्यात आलं. (Fitness freak Sara Ali Khan arrives at the gym despite being injured)
1 / 6
अगदी कमी कालावधीत नवाब कुटुंबाची लेक-अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने आपली एक वेगळी ओळख आणि चित्रपट जगतात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. सारा अली खानने 2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष जादू दाखवू शकला नाही, पण सारा निश्चितपणे लोकांच्या हृदयात आपले स्थान बनवण्यात यशस्वी झाली.
2 / 6
चित्रपटांप्रमाणेच सारा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिचे विनोद आणि अनोख्या शैलीने तिथल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ती विसरत नाही. आता पुन्हा एकदा सारा प्रसिद्धी झोतात आली आहे. वास्तविक, अलीकडेच साराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओसोबतच साराने तिच्या आई-वडिलांची म्हणजेच सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचीही माफी मागितली आहे. एवढेच नाही तर मी नाक कापले, असेही सारा म्हणाली. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया साराने असे काय केले की तिला तिच्या पालकांची माफी मागावी लागली…
3 / 6
अभिनेत्री सारा अली खानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या नाकाला दुखापत झाल्याचे दिसलं.
4 / 6
व्हिडीओ शेअर करताना साराने लिहिलं होतं, ‘सॉरी अम्मा, अब्बा आणि इग्गी. मी माझे नाक कापले.’ साराचा हा व्हिडीओ आणि त्यासोबत लिहिलेले विचित्र कॅप्शन पाहून चाहते खरोखरच आश्चर्यचकित झाले आहेत. तिचे नाक कापून घेतले म्हणजे तिच्या नाकाला दुखापत झाली, असा त्याचा अर्थ आहे. साराने आपल्या मजेदार पद्धतीने ही गोष्ट सर्वांना सांगितली आहे.
5 / 6
आता मुंबईत साराला स्पॉट करण्यात आलं. त्यावेळी तिच्या नाकाला बॅन्डेड लावलेलं दिसलं.
6 / 6
अभिनेत्री सारा अली खान केवळ सोशल मीडियावर सक्रिय नाही, तर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची एक मोठी यादी आहे. तिने इन्स्टाग्रामवर कोणतीही पोस्ट टाकली की, ती लगेच व्हायरल होते. सारा अली खानचे इंस्टाग्रामवर 33 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहेत.