आता लग्न सराई सुरु झाली आहे. त्यामुळे नातेवाईकांच्या लग्नात नक्की कशी आणि कोणती साडी नेसावी? असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. लग्न विधी सुरु असताना अनेक जण काठापदराची साडी नेसतात.
पण आता माधुरी हिने केलेला बोल्ड लूक तुम्ही रिसेप्शन किंवा कोणत्याही पार्टीसाठी फॉलो करू शकता. पाढंऱ्या साडीमध्ये माधुरी हिचं सौंदर्य फुललं आहे.
अनेक जण बॉलिवूड सेलिब्रिटींचा लूक फॉलो करतात. तुम्ही अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा साडीतील लूक नक्की फॉलो करु शकता.
साडीमध्ये अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. मराठमोळ्या अंदाजात देखील अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसतं. माधुरी हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.