मिस युक्रेन अनास्तासिया लेना सध्या चर्चेत आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे तिच्याविषयी समाजमाध्यमात चर्चा होतेय.
अनास्तासिया लेना हिने हातात बंदूक घेत आपला फोटो शेअर केला आहे. तिच्या पोस्टनंतर ती युक्रेनच्या सैन्यात भरती झाल्याची असल्याची चर्चा होती.
अनास्तासिया लेना एक व्हीडिओ पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
" मी सैन्यात भरती झालेली नाही, मी एक सामान्या मुलगी आहे. सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी मी हे फोटो शेअर केले आहेत", असं अनास्तासियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
याआधीही अनास्तासियाने असेच काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
अनास्तासिया लेना ही युक्रेनमधली मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.