बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक आहेत. याच कारणामुळे हे सर्व स्टार्स त्यांच्या आलिशान जीवनशैलीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहतात. प्रत्येक स्टारला स्वतःचा काहीना काही छंद असतो. काही सेलिब्रिटींना महागडे शूज घालण्याची आवड असते, तर काही अभिनेत्री त्यांच्या महागड्या पर्समुळे प्रसिद्धीच्या झोतात येतात. एवढेच नाही तर बॉलिवूड स्टार्सचे स्वतःचे गॅरेजेस देखील आहेत, ज्यात जगातील महागड्या वाहनांचा समावेश आहे. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे स्वतःचे चार्टर्ड प्लेन आहे. तर, आम्ही तुम्हाला अशाच काही प्रसिद्ध स्टार्सबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या वैयक्तिक चार्टर्ड प्लेनने प्रवास करतात.