हीना खान, दिव्यांका त्रिपाठी आणि सुरभि ज्योती. ही अशी काही नावं आहेत जी टीव्हीच्या जगातल्या प्रत्येकाला माहिती आहेत. त्यांनी परिश्रमाच्या जोरावर घराघरात नाव मिळवलं आहे. तर आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीला त्यांना प्रथम फी किती मिळाली हे जाणून घेऊयात.
टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी पासून सुरू करूया. अनेक लोकांना माहिती आहे की दिव्यांकाचा पहिला पगार फक्त 250 रुपये होता. हे पैसे ऑल इंडिया रेडिओमधील कार्यक्रम होस्ट करण्यासाठी मिळाले होते.
'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली हीना खान टीव्ही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कॉल सेंटरमध्ये काम करायची. याठिकाणी तिला पहिला पगार म्हणून 40 हजार रुपये मिळाले होते.
‘ये रिश्ता फेम क्या कहलाता हैं’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीचा पहिला पगार 10 हजार रुपये होता. तर आता ती एका भागासाठी 40 हजार रुपये घेते.
आज एका एपिसोडसाठी 70 हजार रुपये घेणारी सुरभी ज्योती यापूर्वी आरजे म्हणून काम करायची. त्यासाठीचा तिचा पहिला पगार 10,000 रुपये होता.