Sara Ali Khan हिच्या घरी गणपतीची स्थापना; फोटो व्हायरल
Ganesh Chaturthi 2023 | दरवर्षी प्रमाणे अभिनेत्री सारा अली खान हिने बाप्पाचं मोठ्या थाटात स्वागत केलं आहे. सारा हिने सोशल मीडियावर काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र सारा हिच्या गणपतीचे फोटो व्हायरल होत आहेत.
1 / 5
पूर्ण देशात सध्या आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. कारण आज बाप्पाचं आगमन झालं आहे. फक्त सर्व सामान्य नाही तर, सेलिब्रिटी देखील गणरायाचं स्वागत करत आनंद साजरा करत आहेत.
2 / 5
सारा अली खान देखील दरवर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात घरी गणरायाची स्थापना करते. यंदाच्या वर्षी देखील अभिनेत्री गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र सारा हिचे फोटो व्हायरल होत आहेत.
3 / 5
अभिनेत्रीने सोशल मीडियावर घरच्या गणपतीचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'गणपती बाप्पा मोरया' असं लिहिलं आहे. सोशल मीडियावर चाहते अभिनेत्रीच्या पोस्ट लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
4 / 5
सारा अली खान अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जे गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करतात. यंदाच्या वर्षी देखील अभिनेत्रीने गणरायाचं मोठ्या थाटात स्वागत केलं आहे.
5 / 5
सोशल मीडियावर सारा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.