नृत्यांगना गौतमी पाटील कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील गौतमी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दिवाळी पहाट निमित्त शिंदे गटाततील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिने लावणी सादर करत तरुणाईला मंत्र मुग्ध केलं.