‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत खाष्ट ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका सकारात घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
शिमरी पार्टी वेअर ड्रेसमध्ये आता धनश्रीनं छान फोटोशूट केलं आहे. या लूकमध्ये ती कमालीची ग्लॅमरस आणि सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.
‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली.
धनश्रीने साकारलेली ‘नंदिता’ प्रेक्षकांना खूप आवडली. मात्र, मालिका यशाच्या शिखरावर असतानाच तिने या भूमिकेला अलविदा केला होता. अशावेळी तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, गोड बातमी कळताच प्रेक्षकांना खूप आनंद झाला होता. या वर्षीच्या सुरुवातीसच धनश्रीने बाळाला जन्म दिला आहे.
तिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली. मालिका विश्वात सक्रिय असतानाच 2013मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली. आता खऱ्या आयुष्यातही एक नवी भूमिका सशक्तपणे सांभाळण्यास धनश्री तयार झाली आहे.