झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंतानं चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय. तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
आता अपूर्वानं मॅक्सी ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. चाहत्यांनीसुद्धा तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
अपूर्वानं घरातच हे फोटोशूट केलं आहे. वेगवेगळ्या पोज देत तिनं हे फोटोशूट केलं आहे.
अपूर्वा अस्सल मुंबईकर! रुपारेल महाविद्यालयात शिकत असतानाच तिला पहिल्या मालिकेसाठी विचारणा झाली होती. अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.