शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी जामीन मिळाला आहे. मात्र, काल त्याला अखेरची रात्र तुरुंगात काढावी लागली. पण आता आर्यन घरी पोहोचणार आहे.
आर्यनच्या स्वागतासाठी शाहरुखच्या घराचं म्हणजेच मन्नतवर डेकोरेशन करण्यात आलं आहे. त्याच्या आगमनानंतर आज खान कुटुंबीयांचा जल्लोष होणार आहे.
आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.
आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुखने सर्व वकिलांची भेट घेतली. त्याचवेळी अबरामने छतावर जाऊन सर्वांना आनंद दर्शवला.
आर्यनच्या स्वागतासाठी चाहते मन्नतच्या बाहेर सज्ज झाले आहेत.