Happy Birthday Aparshakti Khurana | ‘दंगल’ ते ‘लुकाछुपी’, अपारशक्ती खुरानाने सहायक भूमिकेत गाजवला मोठा पडदा!
आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना याने आपल्या मेहनतीने इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. सहाय्यक अभिनेता म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु असे असूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
1 / 5
अपारशक्तीने ‘दंगल’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, ज्यामध्ये आमिर खान, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते. अपारशक्तीने या चित्रपटात आमिरच्या भाच्याची भूमिका साकारली होती. अपारशक्तीचे आमिरसोबतचे सीन खूपच मजेदार होते. आमिरसारख्या परफेक्शनिस्टसमोरही अपारशक्तीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
2 / 5
अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री’ या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. अपारशक्तीने या चित्रपटात राजकुमारच्या मित्राची भूमिका साकारली होती. अपारशक्ती जरी सहाय्यक भूमिकेत होत, तरी त्याच्या विनोदी टायमिंगने आणि उत्कृष्ट अभिनयाने रसिकांची मने जिंकली. त्याला पडद्यावर पाहून खूप मजा आली. इतकेच नाही तर या चित्रपटासाठी अपारशक्तीला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे नामांकनही मिळाले होते.
3 / 5
अपारशक्तीने बहुतेक चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट मित्राची भूमिका साकारली आहे, त्यात ‘लुका छुपी’चा देखील समावेश आहे. लुका छुपीमध्ये अपारशक्तीने कार्तिक आर्यनच्या मित्राची भूमिका साकारली होती. अपारशक्ती जेव्हा जेव्हा पडद्यावर यायचा तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू यायचे. या चित्रपटानंतर अपारशक्तीची फॅन फॉलोइंग वाढली आहे.
4 / 5
‘जबरिया जोडी’मध्ये, अपारशक्तीने परिणीती चोप्राच्या मित्राची भूमिका केली होती. या पात्रासाठी परिपक्व विनोदी आणि उत्कृष्ट डायलॉग डिलिव्हरीची आवश्यकता होती, जी अपारशक्तीने उत्तमरित्या साकारली आणि नेहमीप्रमाणेच त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
5 / 5
आत्तापर्यंत सहाय्यक भूमिका केल्यानंतर अपारशक्तीने ‘हेल्मेट’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हा एक संवेदनशील विषय होता, जो हलक्याफुलक्या विनोदाने प्रेक्षकांसमोर मांडला गेला. चित्रपटाला कदाचित संमिश्र प्रतिसाद मिळाला असेल, पण अपारशक्तीचे काम खूप पसंत केले गेले.