बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटीनं सैफ अली खान आणि दीपिका पादुकोणसोबत 'कॉकटेल' या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. ( Diana's Birthday, see pictures)
बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटीनं सैफ अली खान आणि दीपिका पादुकोणसोबत 'कॉकटेल' या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. डायना आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.
डायना सोशल मीडियावर खुपच अॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे चाहतेही तिच्या फोटोंना प्रचंड पसंती देतात.
डायनाचा जन्म 2 नोव्हेंबर 1985 ला मुंबईत झाला. तिचं शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पूर्ण झालं.
चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल टाकण्यापूर्वी डायना नोकियासारख्या मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करत होती.
डायनाला कॉकटेल चित्रपटासाठी 2012 मध्ये फिल्म फेअरकडून सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं.
डायनाचं प्राण्यावर प्रचंड प्रेम आहे. ती आपल्या पाळीव प्राण्यासोबत चांगला वेळ घालवते. याचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या तिचा शिद्दत नावाचा चित्रपट ओटीटी मध्यमांमधून प्रेक्षकामच्या भेटीला आला.