Happy Birthday Kulbhushan Kharbanda | सुरुवातीपासूनच अभिनयची आवड असणारे कुलभूषण खरबंदा, जाणून घ्या अभिनेत्याबद्दल…
हिंदी चित्रपट अभिनेते कुलभूषण खरबंदा हे बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. 21 ऑक्टोबर रोजी तो आपला वाढदिवस साजरा करतात. कुलभूषण खरबंदा यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये सह-कलाकाराची भूमिका केली आहे, जी नेहमीच प्रेक्षकांना आवडली.
1 / 5
हिंदी चित्रपट अभिनेते कुलभूषण खरबंदा हे बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. 21 ऑक्टोबर रोजी तो आपला वाढदिवस साजरा करतात. कुलभूषण खरबंदा यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये सह-कलाकाराची भूमिका केली आहे, जी नेहमीच प्रेक्षकांना आवडली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, कुलभूषण खरबंदा यांनी बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांसोबत काम केले आणि नाव कमावले.
2 / 5
कुलभूषण खरबंदा यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1944 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पंजाबमधून केले, नंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी मल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या काळापासून कुलभूषण खरबंदा यांना अभिनयाची आवड होती. महाविद्यालयात असताना, ते अनेक नाटकांचा एक भाग होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुलभूषण खरबंदा यांनी मित्रांसह 'अभियान' नावाचे थिएटर सुरू केले.
3 / 5
यानंतर, कुलभूषण खरबंदा देखील अनेक नाट्यगटांमध्ये सामील झाले. चित्रपटांकडे वळण्यापूर्वी त्यांनी बराच काळ रंगभूमीसाठी काम केले. यानंतर कुलभूषण खरबंदा यांनी चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'जादू का शंख' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट 1974 साली प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी ते श्याम बेनेगल यांच्या 'निशांत' चित्रपटात दिसले. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
4 / 5
यानंतर कुलभूषण खरबंदा यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. भूमिका, र्थ, कलयुग, मैं जिंदा हूं आणि नसीबसह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांनी त्यांच्या जवळजवळ सर्व चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली, परंतु त्यांनी आपल्या अभिनयाने चित्रपट पडद्यावर एक अमिट छाप सोडली. कुलभूषण खरबंदा यांनी 'शान' चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत खूप चर्चा निर्माण केली होती.
5 / 5
1980 मध्ये 'शान' चित्रपट आला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील कुलभूषण खरबंदाच्या खलनायकी व्यक्तिरेखेची बरीच चर्चा रंगली. आजकाल ते त्यांची प्रसिद्ध आणि हिट वेब सीरीज मिर्झापूरमुळे चर्चेत आहेत. कुलभूषण खरबंदा मिर्झापूरच्या पहिल्या सीझनपासूनच बरेच चर्चेत होते. या सीरीजचा दुसरा सीझनही प्रेक्षकांना खूप आवडला होता.