Happy Birthday Pooja Batra | अभिनेत्री असण्याबरोबरच भारताची टॉप मॉडेल देखील बनली होती पूजा बत्रा!
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री पूजा बत्रा (Pooja Batra) 27 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ती आता मोठ्या पडद्यापासून दूर असेल, पण एक काळ असा होता जेव्हा तिची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात होती.
1 / 5
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री पूजा बत्रा (Pooja Batra) 27 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ती आता मोठ्या पडद्यापासून दूर असेल, पण एक काळ असा होता जेव्हा तिची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात होती. पूजा बत्राने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
2 / 5
पूजा बत्राचा जन्म 27 ऑक्टोबर 1976 रोजी उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे झाला. तिचे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते. पूजा बत्राने तिचे ग्रॅज्युएशन पुण्यात केले. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी पूजा बत्राने बराच काळ मॉडेलिंग केले. ती भारतातील प्रसिद्ध मॉडेलपैकी एक आहे. पूजा बत्राने 1993 साली ‘फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल’चा ताजही पटकावला आहे.
3 / 5
पूजा बत्राने जाहिरातींमध्येही दीर्घकाळ काम केले. ‘हेड अँड शोल्डर्स’ या अमेरिकन शॅम्पू जाहिरातीतील ती भारतातील पहिली भारतीय चेहरा होती. प्रदीर्घ काळ जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर तिने चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला. पूजा बत्रा पहिल्यांदा अभिनेता अनिल कपूर आणि तब्बू यांच्या ‘विरासत’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 1997 साली आला होता.
4 / 5
यानंतर पूजा बत्राने ‘भाई’, ‘हसीना मान जायेगी’, ‘दिल ने फिर याद किया’ आणि ‘कही प्यार ना हो जाए’ यासह अनेक अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त पूजा बत्रा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
5 / 5
पूजा बत्राने 2002 मध्ये सर्जन सोनू अहलुवालिया यांच्याशी पहिले लग्न केले आणि अमेरिकेत शिफ्ट झाली, परंतु तिचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. आठ वर्षांनंतर सोनू आणि पूजाचा घटस्फोट झाला. गेल्या वर्षी 4 जुलै रोजी पूजा बत्राने अभिनेता नवाब शाहसोबत दिल्लीत लग्न केले. दोघांनी हे लग्न गुपचूप उरकले होते. नवाब शाह यांनी ‘भाग मिल्खा भाग’, ‘डॉन 2’, ‘दिलवाले’, ‘टायगर जिंदा है’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.