Happy Birthday Ranbir Kapoor : ‘रॉकस्टार’ ते ‘संजू’ पर्यंत, रणबीर कपूरने ‘या’ चित्रपटांमध्ये दाखलली आपल्या अभिनयाची जादू
रणबीर कपूर हा अनेकांचा आवडता अभिनेता आहे. आता त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या उत्तम चित्रपटांबद्दल माहिती घ्या. (Happy Birthday Ranbir Kapoor: From 'Rockstar' to 'Sanju', Ranbir Kapoor's amazing Movies)
1 / 5
रॉकस्टार हा चित्रपट रणबीरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. रणबीरचे चित्रपटातील जनार्दन ते जॉर्डन पर्यंतचे रूपांतर खूपच हटके आहे. चित्रपटात रणबीरने हृदय तुटलेल्या प्रियकर आणि नंतर ड्रग अॅडिक्ट सुपरस्टारची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर रणबीरच्या चाहत्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली.
2 / 5
रणबीरने 'अजब प्रेम की गजब कहानी'मध्ये प्रियकर मुलाची भूमिका साकारली होती. जरी तो त्याच्या प्रेमासाठी काहीही करू शकतो तरी प्रेमाच्या बाबतीत त्याला नेहमीच वाईट नशीब होते. तो ज्याच्यावर प्रेम करायचा त्याला त्याच्या प्रेमाची ओळख करून देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत असे. प्रत्येकाला त्याच्याबद्दल ही गोष्ट आवडली.
3 / 5
अनुराग बसू दिग्दर्शित बर्फी चित्रपटात रणबीर कपूरचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळाला. चित्रपटात रणबीरने एका बहिऱ्या आणि मूक व्यक्तीची भूमिका साकारली आहे जो प्रेमात अपयशी ठरतो, परंतु त्याच्या मोठ्या हृदयासह आणि गोड व्यक्तिमत्त्वाने प्रत्येकाचं मन जिंकतो. जेव्हा त्याची मैत्रीण दुसऱ्या कुणाशी लग्न करते तेव्हा तो प्रियंकाच्या पात्राच्या जवळ येतो. सुरुवातीला तो तिच्यापासून पळून जातो, पण नंतर दोघंही एकमेकांच्या जवळ येतात. रणबीरने चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे.
4 / 5
रणबीर कपूरने संजय दत्तच्या जीवनावर बनलेला संजू चित्रपट हिट केला. रणबीरने केवळ संजयचा लुकच कॅरी केला नाही, तर त्याची चालण्याची पद्धत, त्याची बोलण्याची पद्धत, सर्व काही इतकं छान केलं होतं, असे वाटेल की हा रणबीर नाही तर संजय दत्तच आहे.
5 / 5
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ये जवानी है दिवानी'मध्ये रणबीरने कबीरची भूमिका साकारली होती. कबीर हुशार होता, ज्याला संपूर्ण जग त्याच्या मुठीत ठेवायचं होतं. प्रत्येक मुलगी कबीरने प्रभावित व्हायची. संपूर्ण जग फिरणे आणि तिथला प्रत्येक क्षण टिपणे हे त्याचं स्वप्न होतं. पण तो खऱ्या प्रेमात पडताच, त्याच्यासाठी असलेले परिपूर्ण जग हे सर्व खोटं आहे असं वाटतं. यानंतर कबीरला कुटुंब आणि मित्रांचं महत्त्व समजते.