बनायचं होत आयएएस अधिकारी, डान्स शो जिंकून बनली कोरिओग्राफर, वाचा शक्ती मोहनबद्दल
आपल्या नृत्याच्या जोरावर संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवणाऱ्या शक्ती मोहन आज आपला 33वा वाढदिवस साजरा करत आहेत. तिचा जन्म 12 ऑक्टोबर 1985 रोजी दिल्लीत झाला, पण तिचे संगोपन मुंबईत झाला. नशीबाने शक्तीला एक नवीन ओळख दिली, जिला एकेकाळी आयएएस बनण्याची इच्छा होती आणि आज ती एक उत्कृष्ट डान्सर आहे.
1 / 5
आपल्या नृत्याच्या जोरावर संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवणाऱ्या शक्ती मोहन आज आपला 33वा वाढदिवस साजरा करत आहेत. तिचा जन्म 12 ऑक्टोबर 1985 रोजी दिल्लीत झाला, पण तिचे संगोपन मुंबईत झाला. नशीबाने शक्तीला एक नवीन ओळख दिली, जिला एकेकाळी आयएएस बनण्याची इच्छा होती आणि आज ती एक उत्कृष्ट डान्सर आहे. एकेकाळी ' डान्स प्लस ' या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये सहभागी झालेली शक्ती आज स्वत: एक शो जज करत आहे.
2 / 5
शक्तीने तिचे प्रारंभिक शिक्षण दिल्लीतील बिर्ला बालिका विद्यापीठातून पूर्ण केले आहे. तिने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून उच्च शिक्षण पूर्ण केले. येथून तिने राज्यशास्त्रात बीए केले आहे.
3 / 5
शक्ती मोहनला आधी आयएएस व्हायचे होते, पण नशीबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. 2009 मध्ये, शक्ती मोहनची निवड झी टीव्हीवरील 'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोच्या सीझन 2 मध्ये झाली. शक्ती मोहनने 'डान्स इंडिया डान्स'चा सीझन 2 जिंकून दाखवले की, तिचे स्वप्न आयएएस बनण्याचे नाही, तर डान्सर बनण्याचे आहे. 2009पासून आतापर्यंत या 8 वर्षात शक्ती सातत्याने यशाच्या पायऱ्या चढत आहे.
4 / 5
'डान्स इंडिया डान्स' जिंकल्यानंतर शक्तीने मोठ्या पडद्यावरही आपली छाप सोडली आहे. ती 'तीस मार खान', 'कांची' आणि 'राऊडी राठोड' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
5 / 5
शक्ती नृत्याच्या क्षेत्रात खूप पुढे आली आहे. आता ती अनेक डान्सिंग शो जज करते. तिने 'डान्स प्लस’मध्ये परीक्षकाची भूमिका बजावली आहे.